Deepak Kulkarni
एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय वायुसेनेचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दीक्षित हे 31 ऑक्टोबर 2026 रोजी एअर चीफ मार्शल पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
आशुतोष दीक्षित हे सध्या व्हाइस एअर चीफ मार्शलची जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते 31 डिसेंबर 2028 पर्यंत या पदावर कार्यरत असणार आहे.
भारतीय वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममधील अधिकारी म्हणून दीक्षित यांची ओळख आहे. तसेच त्यांच्याकडे कारगिल युद्धावेळचा ऑपरेशनल अनुभवही आहे. विशेष म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत 20 प्रकारची लढाऊ विमाने उडवली आहेत.
भारतीय वायुसेनेच्या प्रमुखांना सुमारे 2.25 लाख रुपये प्रतिमहिना वेतन असते.
महत्त्वाची बाब म्हणजे एअर चीफ मार्शल यांना सुविधा आणि भत्ते भरपूर प्रमाणात मिळत असतात. त्यात महागाई भत्ता, हाऊस रेंट आणि इतर लागू भत्त्यांचा समावेश असतो.
वायुसेना प्रमुखांसारख्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सरकारी निवासस्थानाची सुविधा उपलब्ध असते.
तसेच लष्करी सेवेशी संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहतूक आणि वैद्यकीय सुविधाही मिळतात.
आशुतोष दीक्षित ते नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA), डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये कमिशन मिळवले होते.