सरकारनामा ब्यूरो
2018 मध्ये यूपीएससी परीक्षेत आयएएस अक्षत जैन यांनी भारतात दुसरा क्रमांक मिळवला.
अक्षत हे मूळचे राजस्थानमधील जयपूर येथील आहेत.
दुसऱ्याच प्रयत्नात देशात दुसरा क्रमांक मिळवत ते आयएएस झाले.
अक्षत यांचे आई आणि वडील दोघेही उच्चशिक्षित आणि पोलीस सेवा दलात वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.
यूपीएससी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे ज्यात अभ्यासाच्या पायऱ्या आणि पद्धतींचा सखोल अभ्यास आहे.
शालेय जीवनापासूनच ते अभ्यासात हुशार होते आणि त्यात त्यांचा अधिक रस होता.
अक्षत हे फुटबॉलपटू आणि तरबेज स्वीमर आहेत.
पदवी शिक्षणासाठी त्यांनी आयआयटी गुवाहटी येथे प्रवेश घेतला.
नववीत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती.