सरकारनामा ब्यूरो
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 मध्ये गुजरात येथील नडियादमध्ये झाला.
लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टर पदवी घेतल्यावर परत भारतात येऊन वकिली काम करू लागले.
लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन उत्तम कारकीर्द गाजवली.
1928 मध्ये झालेला बार्डोली सत्याग्रह त्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाला.
शेतकऱ्यांवरील कर कमी करण्यात यावा आणि नवीन दरवाढीच्या निषेधार्थ हा सत्याग्रह करण्यात आला होता.
बार्डोली सत्याग्रहापासून त्यांना सरदार या नावाने संबोधले जाऊ लागले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी लढल्यामुळे गुजरातमधील या सत्याग्रहानंतर लोकांमध्ये यांच्याबद्दल अधिक आदर निर्माण झाला आणि ते भारतातील महत्त्वाचे नेते बनले.