Deepak Kulkarni
एखाद्या महाविद्यालयीन तरुणासारखा दिसणारा राजस्थान केडरमधील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी म्हणून अभिजीत पाटील सध्या सोशल मीडियावर प्रचंड आकर्षणाचा विषय ठरत आहे.
महाराष्ट्राच्या ठाणे शहरात अभिजीत पाटील यांचा जन्म 11 जून 1999 रोजी झाला. त्यांनी 22 वर्षीच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
कमी वयात आयपीएस पदवी मिळवलेल्या अभिजीत पाटील यांनी UPSC ची सिव्हील परीक्षा पहिल्याच प्रयत्नात आणि विशेष म्हणजे कोणत्याही कोचिंग शिवाय पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.
अभिजीत पाटील यांनी 2022 मध्ये 470 वी रँक मिळाली आहे. त्यांची राजस्थान कॅडरमध्ये सर्वात तरुण आयपीएस म्हणून ओळखले जातात.
त्यांचे वडील तुलसीराम पाटील आणि आई आशादेवी स्वेच्छानिवृत्त आहेत.तुलसीराम पाटील हे मुंबई महानगरपालिकेत चीफ ऑडिटर तर आई सिंचन खात्यात नोकरीला होती.
अभिजीत पाटील हे भारताच्या पहिल्या दहा सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
अभिजीत पाटील यांचं बी.टेक. (सिव्हिल आणि एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग) पूर्ण करतानाच यूपीएससीची तयारी सुरू केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे इंजिनिअरींगच्या पदवी परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली होती.
अभिजीत पाटील यांच्या 'बेबी फेस'मुळे अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. पण त्यांनी आपल्या काम आणि आत्मविश्वासानं त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत कमी वेळेत छाप पाडली आहे.
आयपीएस अधिकारी अभिजीत पाटील यांना दोन बहिणी असून ते एकुलते एक धाकटे भाऊ आहेत.