Ajit Doval: PM मोदींचा अजित डोवाल यांच्यावर का आहे एवढा 'भरोसा'! तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी...

Deepak Kulkarni

तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी...

अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Ajit Doval | Sarkarnama

नियुक्ती पत्र जारी

भारत सरकारकडून यासंदर्भातील नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे.

Ajit Doval | Sarkarnama

असे पहिले अधिकारी

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी सर्वाधिक काळ राहणारे पहिले अधिकारी म्हणून अजित डोवाल यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.

Ajit Doval | Sarkarnama

10 जून 2024 पासून नियुक्त

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची 10 जून 2024 पासून नियुक्त केले आहे.

Ajit Doval | Sarkarnama

मोदी सत्तेत आल्यापासून जबाबदारी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून म्हणजेच 2014 आणि 2019 साली त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Ajit Doval | Sarkarnama

मोदींचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू...

डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात.

Ajit Doval | Sarkarnama

कीर्ती चक्राने सन्मानित

1968 च्या आयपीएस केडरचे ते अधिकारी असून त्यांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहेत. असे ते पहिले पोलिस अधिकारी आहेत.

Ajit Doval | Sarkarnama

गुप्तचर यंत्रणेमध्ये उल्लेखनीय काम...

इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून ते 2005 रोजी निवृत्त झाले. डोवाल यांच्या गुप्तचर यंत्रणेमधील कामगिरीची खूप चर्चा झाली.

Ajit Doval | Sarkarnama

Ajit Dovalसर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठा वाटा...

1999 चं कंधारमधील विमान अपहरण,1984 मधील ऑपरेशन ब्ल्यू स्टार,2019 च्या सर्जिकल स्ट्राईकच्या 'मास्टरमाईंड' महत्वाचा वाटा होता.

Ajit Doval | Sarkarnama

NEXT : शपथविधी पाहायला गेले अन् मंत्री झाले; जॉर्ज कुरियन कोण आहेत?