Roshan More
१९६८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजित डोवल यांना भारताचे 'रिअल लाईफ जेम्स बाँड' म्हटले जाते. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी अनेक प्राणघातक मोहिमा फत्ते केल्या आहेत.
अजित डोवल तब्बल ६ वर्षे गुप्तपणे पाकिस्तानात मुस्लीम बनून राहिले. शत्रूच्या भूमीत राहून त्यांनी भारतासाठी अत्यंत गोपनीय माहिती गोळा केली.
मिझो नॅशनल फ्रंटच्या बंडखोरांच्या तंबूत घुसून डोवल यांनी थेट त्यांच्या मुख्य नेत्यांचे मन परिवर्तन केले आणि मिझोराममधील हिंसाचार एका फटक्यात थांबवला.
१९८८ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दहशतवादी लपले असताना, डोवल आयएसआय (ISI) एजंट बनून आत गेले आणि दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती भारतीय सैन्याला दिली.
उरी हल्ल्यानंतरची 'सर्जिकल स्ट्राईक' असो वा पुलवामानंतरचा 'बालाकोट एअर स्ट्राईक'; शत्रूच्या सीमा ओलांडून बदला घेण्याच्या रणनीतीमागे डोवल यांची रणनीती होती.
लष्करी सैनिकांना दिला जाणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'कीर्ती चक्र' मिळवणारे अजित डोवल हे देशातील पहिले पोलीस अधिकारी ठरले.
"शत्रूने हल्ला करण्याची वाट पाहायची नाही, तर शत्रूच्याच भूमीत जाऊन त्याचा बिमोड करायचा" हा 'डोवल डॉक्ट्रिन' सिद्धांत आज भारताच्या सुरक्षा धोरणाचा कणा आहे.
IPS News : 'Gen Z' चा मराठमोळा IPS अधिकारी देशभर चर्चेत