Ajit Pawar : बारामतीत प्रचार गार; अजित पवारांचा शरद पवार गटावर प्रहार

Sunil Balasaheb Dhumal

प्रचार थंडावला

बारामतीत 7 मे रोजी मतदान होत आहे. त्यापूर्वी 5 मेला प्रचाराची सांगता झाली. त्यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांचा समाचार घेतला.

Ajit Pawar | Sarkarnama

अजित पवार आक्रमक

सुप्रिया सुळेंच्या रोहित पवार भावूक झाले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावले.

Sunetra Pawar | Sarkarnama

रोहित पवारांवर टीका

हे पाहा आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं, असा हल्लाबोल अजितदादांनी केला.

Ajit Pawar | Sarkarnama

दादांचं नाटक

आता मी पण रडतो, मला मतदान द्या, असे म्हणत डोळा मारून त्यांनी रुमाल काढला आणि डोळे पुसले.

Ajit Pawar | Sarkarnama

रडीचा डाव

आता बारमतीकर नौटंकी खपवून घेणार नाहीत. हा झाला रडीचा डाव. तुम्ही कामे दाखवा, खणखणीत नाणं दाखवा, असे आव्हान त्यांनी दिल.

Ajit Pawar Sabha | Sarkarnama

बाळकडू

आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेलं आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करताय, अशी टीकाही रोहित यांच्यावर केली.

Ajit Pawar

बारामतीचा विकास

मोदी-शाहांवर टीका करून, संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होणार नाही.

Ajit Pawar

सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

अजित पवार काय पर्स घेईल का रे, तुम्हाला पटतं का? सदानंद सुळे काय पर्स घेऊन जातात का संसदेत?

Ajit Pawar

विजय आपलाच

या सभेला जमलेली गर्दी पाहिल्यावर नक्कीच स्पष्ट होतं, की विजय आपलाच आहे फक्त गाफिल राहू नका.

Sunetra Pawar

NEXT : शरद पवार यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे