Sachin Waghmare
बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस होता.
ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आवाज बसला असताना ही त्यांनी येथील प्रचार सांगता सभेत जोरदार भाषण.
प्रचाराची वेळ सहाला संपणार असल्याने त्यांनी भाषण आवरते घेतले.
शरद पवार यांनी टीका टिपण्णी करणे टाळले.
देशाच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची असून या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
बारामतीकर जोपर्यंत एक आहोत, तोपर्यंत आपल्याला कोणीच काही करू शकत नाही, असेही पवार म्हणाले.
ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे, जनतेचे प्रश्न खूप आहेत.
विशेषतः महागाईचा प्रश्न आहे. त्यासोबतच शेतीचा प्रश्न आहे.
तुमचा निर्णय हा बारामतीकरांच्या नव्हे तर देशाच्या हिताचा असेल, असेही त्यांनी सांगितले.