Ganesh Sonawane
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे (ता.२८) बारामती येथे विमान अपघातात निधन झाले.
आज सकाळी 11 वाजता बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्यावर पुत्र पार्थ आणि जय यांनी अंत्यसंस्कार केले.
दादांचे अंतिम दर्शन करण्यासाठी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून समर्थक तसेच नागरिकांनी अफाट गर्दी केली होती.
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे सर्व पवार कुटुंबीय, मंत्री तसेच विविध पक्षाचे नेते, आमदार, कार्यकर्तेही उपस्थित आहेत.
यावेळेस तेथे जमलेल्या नागरिकांनी 'अजित दादा अमर रहे' आणि 'अजित दादा परत या' अशा घोषणा दिल्या.
आपल्या लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं.
या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही अपघातात मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
थरथरत्या पावलांनी, डोळ्यांत अश्रूंचा पूर घेऊन सुनेत्रा वहिनी जेव्हा दादांच्या पार्थिवासमोर उभ्या राहिल्या, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी त्यांना आधार दिला.