Roshan More
आज बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले.
त्यांच्या राजकीय जडणघडणीला 1982 साली प्रारंभ झाला.
सहकारी साखर कारखाना, सहकारी संस्थांच्या निवडणुकीत त्यांची एन्ट्री झाली. आणि ते श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले.
अजित पवार यांनी 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले.
शरद पवार यांनी केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा आपल्या काकांसाठी त्यांनी अवघ्या अडीच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला.
शरद पवारांच्या बारामतीमधील रिक्त विधानसभेच्या जागेवरून अजित पवार विधानसभेत गेले.
अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे सलग 16 वर्ष अध्यक्ष होते.
अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले. तब्बल सहा वेळा ते उपमुख्यमंत्री झाले.