'काळीज पिळवटून निघतंय, मन पार तुटून जातंय...'; 'ते' फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा

Jagdish Patil

अजित पवार

आज 22 जुलै रोजी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांची जयंती आहे.

Ajit Pawar Birth Anniversary | Sarkarnama

सुनेत्रा पवार

जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Ajit Pawar Birth Anniversary

अभिवादन

सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली.

Ajit Pawar Birth Anniversary | Sarkarnama

आठवणी

या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी दादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Ajit Pawar Birth Anniversary

'जयंती'

'तुमचा वाढदिवस 'जयंती' म्हणून मानताना मन आतून तुटून जातंय. हे कटू सत्य स्वीकारायला मन तयार होत नाही दादा', असं त्यांनी म्हटलंय.

Ajit Pawar Birth Anniversary | Sarkarnama

फुल

सुनेत्रा पवारांनी शेअर केलेल्या एका फोटोत त्या अजितदादांच्या खिशाला फुल लावताना दिसत आहेत.

Ajit Pawar Birth Anniversary

फॅमिली

तर आणखी एक जय आणि पार्थ पवार यांचा दादांसोबतचा फॅमिली फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

Ajit Pawar Birth Anniversary | Sarkarnama

आधार

काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Birth Anniversary | Sarkarnama

मन तुटून जातंय

'आज हा दिवस साजरा करताना मन आतून तुटून जातंय, काळीज पिळवटून निघतंय, डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत.'

Ajit Pawar Birth Anniversary | sarkarnama

आठवणी

'दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात, तरी तुमचे विचार, आठवणी माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहतील.'

Ajit Pawar Birth Anniversary

अभिवादन

'माझ्या आयुष्याच्या साथीदाराला, तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम', अशा शब्दात त्यांनी दादांना अभिवादन केलं.

Ajit Pawar Birth Anniversary | Sarkarnama

NEXT : 'केंद्रात नरेंद्र अन् शिक्षण खात्यात धर्मेंद्र...'; CJP च्या आंदोलनावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

BJP Reaction on CJP Protest | Sarkarnama
क्लिक करा