Jagdish Patil
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे.
याच मागणीसाठी काल आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.
पोलिसांनी आंदोलकांवर मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज केल्यामुळे तिथलं वातावरण चिघळलं.
दरम्यान, काल झालेल्या आंदोलनावर भाजप नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिलेत ते जाणून घेऊया.
CM फडणवीसांनी आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे पण जाणीवपूर्वक अशांतता करण्याकरता विनापरवानगी आंदोलन, हिंसा करणे योग्य नसल्याचं म्हटलं.
या आंदोलनातून राजकीय पक्ष आपली पोळी कशी भासता येईल याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते म्हणाले.
तर आंदोलनात काही लोक चांगल्या भावनेने सहभागी झालेत. पण काही स्वार्थ साधण्यासाठी आंदोलन करीत होते असंही ते म्हणाले.
भाजप नेते सदाभाऊ खोतांनी "सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊ नये आणि या आतंकवाद्यांना जशाच तसं उत्तर द्यावं.", असं म्हटलं.
देशात आदरणीय नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्रजी यात काही बदल होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आंदोलनामध्ये मविआ आणि इंडिया आघाडी आतंकवादासारखी परिस्थिती देशात निर्माण करू पाहत असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, हे आंदोलन लोकांची दिशाभूल करण्यासाठी असल्याची सुरू असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या आंदोलनात २-३ ट्रकभर दगड आणले होते. त्यामागचा हेतू काय होता? याचा सरकार तपास करत असल्याचंही बावनकुळे म्हणाले.