Jagdish Patil
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे.
वाढदिवसानिमित्त अजितदादांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
इतर नेत्यांपेक्षा त्यांच्या पत्नी, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजितदादांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.
शब्द कमी, कृती अधिक, असं अजितदादांचं व्यक्तिमत्व आहे. शब्दांपेक्षा कर्तृत्व मोठं असतं. त्यांचं संपूर्ण सार्वजनिक जीवन हे त्याचं जिवंत उदाहरण आहे, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
राजकीय नेत्यांप्रमाणे निवृत्त सनदी अधिकारी दिलीप बंड यांनी देखील अजितदादांच्या कामाचे किस्से वाढदिवसानिमित्त सांगितले आहेत.
'PCMC'मध्ये रुजू झाल्यावर शहराचे मुख्य रस्ते रुंद करण्यासाठी मोठ्या लोकांच्या अतिक्रमणावर कारवाईसाठी मी दादांची पूर्व परवानगी घेतली. तेव्हा त्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही.
"तुम्ही काम करा, मी मागे आहे." त्यानंतर 2000 पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढलं. त्यात अनेक प्रतिष्ठितांची मालमत्ता होती, तरीही दादांनी राजकीय दडपण टाकलं नाही, असं बंड यांनी सांगितलं.
तसंच 'डीपीडीसी'ची मीटिंग सकाळी 9.30 ला आयोजित केली होती. दादा वेळेत आले; पण काही आमदार, खासदार गैरहजर राहिले.
त्यानंतर 10 ला मीटिंग संपल्यानंतर ते आले. यावेळी दादांनी त्यांना, 'वेळ दिली की पाळली पाहिजे; अन्यथा बदल होणार नाही.', अशी सूचना वजा दम भरला.