Sachin Fulpagare
शेवटची निवडणूक सांगून मते मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका, असे आवाहन अजित पवारांनी बारामतीत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भाषणात टोला लगावला. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले.
'ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणलं, ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवलं त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय. म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही. पाषाणालाही पाझर फुटतो', असे आव्हाड म्हणाले.
'तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिलेली नाही. तुम्ही भावनाशुन्य झाला आहेत. शरद पवारांचे मरण ही तुमची इच्छा आहे आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसतेय', असे म्हणत आव्हाडांनी संताप व्यक्त केला.
'तुम्ही त्यांचा किती द्वेष करता हे मी फार पूर्वीपासून बघितलंय. कोणत्याच मिटिंगमध्ये तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हतात', असे आव्हाड यांनी सुनावले.
'प्रत्येकाला मरायचे आहे. अजित पवार तुमचीही शेवटची निवडणूक येणार आहे. पण बापाच्या मरणाची वाट बघणारी अवलाद बघितली नाही', असा आव्हाड यांनी लगावला.
'तुम्ही तर चक्क बापाची तिरडीच उचलायला निघालात. आणि म्हणे हा महाराष्ट्राचा नेता. लाजच वाटते, अशा माणसाबरोबर काम केलं. हे तर किळसवाणं वाटतं', अशी टीका आव्हाड यांनी केली.
'शरद पवार बोलायचे तेव्हा तुम्ही बरं बरं असंच झालं पाहिजे म्हणायचे. तुमची नजर असायची भलतीकडेच. या महाराष्ट्राला कळेल की काय माणूस आहे हा. आपल्या काकांच्या मृत्यूची वाट बघतोय. हे राजकारण आहे का?', असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.