Rajanand More
सुरन्या अय्यर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या कन्या आहेत. वडिलांसोबत दिल्लीत राहतात.
पेशाने वकील असून मानवाधिकार क्षेत्रात काम करतात. वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याविरोधात तीन दिवसांचा उपवास करण्याचे सोशल मीडियातून आवाहन केले होते.
सुरन्या यांनी जाहीर केल्याप्रमाणे 21 ते 23 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याविरोधात तीन दिवस उपवास केला.
तीन दिवस उपवास केल्यानंतर आईच्या हातून मध खात उपवास सोडला.
विरोधामुळे शेजाऱ्यांनी बाप-लेकीला घर सोडण्याची नोटीस बजावली होती. तसेच माफी मागण्यास सांगितले होते.
भाजपसह इतर अनेक संघटनांनी या सुरन्या यांच्यावर जोरदार टीका केली. पण त्यांनी माघार घेतली नाही.
सुप्रीम कोर्टातील वकील व भाजपचे नेते अजय अग्रवाल यांच्याकडून दिल्लीत सायबर पोलिसांत तक्रार दाखल.
समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी सुरन्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.