Jagdish Patil
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (ता.28) विमान अपघातात निधन झालं.
अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
यापूर्वी अजितदादांनी तब्बल 6 वेळा राज्याचं उपमुख्यमंत्री बनत नवा इतिहास रचला होता.
पण महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद कधी अस्तित्वात आलं आणि पहिले उपमुख्यमंत्री कोण होते ते जाणून घेऊया.
आणीबाणीनंतर देशातील काँग्रेसमधील फुटीमुळे 1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही (इंदिरा आणि रेड्डी) काँग्रेस स्वतंत्र लढल्या.
निकालानंतर जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वसंतदादा पाटील दोन्ही काँग्रेस एकत्र आणत सत्ता स्थापन केली.
यावेळी महाराष्ट्रातले इंदिरा गांधींचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या नेत्यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यासाठी धडपड केली.
यामध्ये नासिकराव तिरपुडे यांचाही समावेश होता. त्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.
तेव्हापासून महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पद निर्माण झालं. नासिकराव तिरपुडे यांचा कार्यकाळ मार्च 1978 ते जुलै 1978 असा होता.
तर सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर पाटील या नेत्यांनी उपमुख्यमंत्रिपद भुषवलं आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ते निधनापर्यंत उपमुख्यमंत्रीच राहिले.