Jagdish Patil
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता.28) बारामतीत विमान अपघातात निधन झाले.
आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी अजित पवारांचे काका तथा देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते.
अजित दादांचं असं अकाली जाणं हा शरद पवारांसाठी सर्वात मोठा धक्का होता.
त्यामुळे आपल्या लाडक्या पुतण्याच्या अंत्य दर्शनासाठी आलेल्या शरद पवारांचे दु:ख त्यांनी लवपूनही लपत नव्हतं.
शरद पवार विद्या प्रतिष्ठान मैदानावर येताना आणि तिथे बसल्यावर त्यांची हावभाव कॅमेऱ्यात टिपली गेली.
यावेळी त्यांचे थरथरणारं शरीर आणि पाणावलेले डोळे पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक बारामतीत जमा झाले होते.
यावेळी दादांची बहीण खासदार सुप्रिया सुळे भावुक झालेल्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या.