Ajit Pawar Leaders: महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांनी घडवलेले दिग्गज नेतेमंडळी,ज्यांनी विरोधकांनाही वेळोवेळी घाम फोडला

Deepak Kulkarni

महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर

महाराष्ट्रावर मंगळवारी दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्देवी मृत्यू झाला.

Ajit Pawar | Sarkarnama

अजित पवार यांच्या ओळखी

महाराष्ट्राच्या राजकारणात धडाकेबाज नेतृत्व,रोखठोकबाणा,वक्तशीरपणा,प्रशासनावर वचक,दांडगा जनसंपर्क, कामाचा प्रचंड मोठा झपाटा अशा साऱ्या अजित पवार यांच्या ओळखी आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी अनेक नेत्यांना राजकारणात घडवलं,संधी दिली आणि पुढं आणलं.

Ajit Pawar | Sarkarnama

सुनील शेळके

सुनील शेळके हे अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये निवडून आलेले शेळके, अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जातात. भाजपला रामराम ठोकल्यानंतर शेळकेंना विश्वास दाखवत अजित पवारांनी त्यांना मोठं पाठबळ दिलं.

Sunil Shelke | Sarkarnama

रोहित पवार

रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत आणि राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांनी ‘काकां’सोबत न जाता, ‘आजोबां’सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण रोहित पवारांना राजकीय आखाड्यात उतरवण्यापासून ते आमदार करण्यापर्यंतच्या प्रवासात अजितदादांचा मोठा वाटा होता.

Rohit Pawar | Sarkarnama

संग्राम जगताप

संग्राम जगताप दोनदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेवर निवडून आले आणि एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून निवडून आले. पण संग्राम जगतापांना शहराध्यक्षपदापासून एक एक संधी देत आमदार करण्यात अजितदादांचा योगदान मोठं राहिलं आहे.

Sangram jagtap | Sarkarnama

सुनील टिंगरे

अजितदादांच्या अत्यंत विश्वासू नेता म्हणून सुनील टिंगरेंकडे पाहिले जाते. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून टिंगरेंना थेट भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याविरोधात उभं केलं आणि निवडूनही आणलं. पोर्शेकार अपघात प्रकरणात आरोप होऊनही दादांनी त्यांना ताकद देत 2024 ला उमेदवारीही दिली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला.

Sunil Tingre | Sarkarnama

शंकर मांडेकर

शंकर मांडेकर हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संग्राम थोपटेंसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता. त्यांचे अजित पवार यांच्याशी निकटचे राजकीय संबंध आहेत,असून मांडेकरांच्या राजकारणावर दादांचा प्रभाव दिसून येतं.

Shankar Mandekar | Sarkarnama

निलेश लंके

निलेश लंके यांना शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणल्यानंतर अजित पवार यांनी आपली राजकीय ताकद वापरत पारनेरमधून आमदार म्हणून निवडून आणलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर लंके शरद पवारांसोबत गेल्यानंतरही दादांबद्दलचा त्यांचा आदर आणि भावनिक संबंध कायम होते.

Nilesh Lanke | Sarkarnama

दत्तात्रय भरणे

अजित पवार यांनी नेहमीच दत्तात्रय भरणे यांना इंदापुरातून मोठी ताकद दिल. पहिल्या निवडणुकीत भरणे यांचा पराभव झाल्यानंतर दादांनी त्यांना पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष करत पाठबळ दिलं. त्यानंतर दत्तात्रय भरणे हे हर्षवर्धन पाटलांचा इंदापुरातून सलग तीनदा पराभव करून विधानसभेत आमदार झाले. सध्यातर त्यांच्याकडे कृषिमंत्री पद आहे.

Dattatray Bharane | Sarkarnama

राजेश विटेकर

राजेश विटेकर हे अजित पवार यांच्या नेतृत्वावरील विश्वासू कार्यकर्ते मानले जातात, ज्यांनी पक्षातील विभाजनानंतर अजित पवारांची साथ दिली. जुलै 2024 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न केलं.

Rajesh Vitekar | Sarkarnama

NEXT : डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर जरब; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तिशीतील 'रुबाबदार' अनसीन फोटो...

Ajit Pawar | Sarkarnama
येथे क्लिक करा...