सरकारनामा ब्यूरो
पुण्याच्या बारामतीत आज (दि.3 मार्च) नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या मेळाव्यासाठी बारामतीत आले होते.
अजित पवारांनी दोघांचेही बारामती विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच नियोजनात अडचणी येऊ नयेत, यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त अन् चोख नियोजन करण्यात आले आहे.
बारामतीमधील अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त अनेक प्रकल्पांचेही या वेळी उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले.
भव्य अन् आकर्षक बस स्थानकाबरोबर, पोलिस उपमुख्यालय, अपर पोलिस अधीक्षक कार्यालय तसेच पोलिस वसाहतींचा यात समावेश आहे.
बारामती पोलिसांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीचा व्हावा, यासाठी नवीन जीपची भर धातली आहे.
दुरवस्था झालेल्या पोलिस लाइनच्या वसाहतीच्या जागी नवीन इमारती उभारल्या. यामुळे त्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध होणार आहेत.
R