Ganesh Sonawane
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले.
अजित पवार हे मुंबईहुन बारामतीला येत होते. बारामतीच्या धावपट्टीजवळ त्यांचे विमान कोसळले व स्फोट झाला.
या अपघातात अजित पवार यांच्यासह एकुण पाच जणांचा मृत्यू झाला.
दादांच्या अकाली निधनाने सर्व राज्यात शोककळा पसरली असून अनेक जण दादांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने अजित पवार यांचे काही अनसीन फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
हे फोटो नाना पाटेकर यांच्या फार्महाऊस येथील आहेत.
एका फोटोत नाना पाटेकर, अजित पवार, निलकांती पाटेकर व मल्हार पाटेकर दिसत आहेत. अजित पवार व नाना पाटेकर जेवण करत असून गप्पा मारत आहेत.
अजितदादांच्या निधनाने आमचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. ते आमच्यासाठी कुटुंबासारखे होते आणि आयुष्यभर राहतील. त्यांच्याबरोबरच्या अविस्मरणीय आठवणी..त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे,असे कॅप्शन देत मल्हार पाटेकरने फेसबुकवर पोस्ट केली आहे.