Roshan More
बारामती नगरपरिषदेच्या मतदानाच्या आधी दोन दिवस अजित पवार बारामतीमध्ये होते.
त्यांनी बारामतीतील आकाश टी कॉर्नर येथे गरमागरम चहाचा आस्वाद घेत बारामतीकरांशी संवाद साधला.
अजित पवारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटले आहे की, दोन घटका आपुलकीच्या गप्पा मारल्या, मनमोकळा संवाद साधला.
अजित पवारांसोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
चहा विक्रेत्याशी देखील अजित पवारांनी संवाद साधला.
चहाचा अस्वाद घेतल्यानंतर अजित पवारांनी लगेच चहा विक्रेत्याचे पैसे देण्यास आपल्या सहाय्यकांना सांगितले.
अजित पवारांसोबत फोटो घेण्याची इच्छा चहा विक्रेत्याने व्यक्त करताच एका फोटोला 100 रुपये लागतील असे म्हणत चहा विक्रेत्याची फिरकी घेतली.