Rajanand More
महाराष्ट्रातील धडाकेबाज IAS अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे ओळखले जातात. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांनी त्यांच्या बडतर्फी मागणी केल्यानंतर पुन्हा एकदा ते प्रकाशझोतात आले.
मुंढे यांच्याप्रमाणेच नियम अन् कायद्यावर बोट ठेवत प्रशासकीय कामकाज सुधारणारे अधिकारी म्हणून IAS स्वप्निल वानखडे ओळखले जातात.
महाराष्ट्राचे सुपुत्र स्वप्नील वानखडे हे महाराष्ट्रात कार्यरत नसून मध्य प्रदेशात प्रशासन गाजवत आहेत. सध्या ते दतिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
वानखडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर जनसुनावणीत त्यांच्यासमोरच एका तलाठ्याचे निलंबनाचे आदेश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी वानखडे हे जिल्ह्यात ठिकठिकाणी सातत्याने जनसुनावणीचे आयोजन करतात. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत ते जागेवरच अधिकाऱ्यांना कार्यवाही आणि कारवाईचेही आदेश देत असल्याने लोकप्रिय बनले आहेत.
IAS वानखडे हे मुळचे अमरावतीचे आहेत. 2016 च्या तुकडीचे मध्य प्रदेश केडरचे अधिकारी. धडाकेबाज अधिकारी म्हणून राज्यात ओळख निर्माण केली आहे.
वानखडे यांच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. यापूर्वी ते जबलपूरचे आयुक्त, रेवाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर काम केले आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून वानखडे यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला अन् चौथ्या प्रय़त्नात त्यांना यश मिळाले. 132 वी रँक मिळवत ते IAS बनले.