आमदारकीचा शेवटचा दिवस अजितदादांच्या नावे; अमोल मिटकरींचा भावनिक क्षण होतोय व्हायरल

Jagdish Patil

अमोल मिटकरी

अधिवेशनाच्या अखेरचा दिवशी अजित पवारांचा फोटो घेऊन आमदार अमोल मिटकरी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसले होते.

Amol Mitkari with Ajit Pawar photo | Sarkarnama

मागणी

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत त्यांनी अजितदादांच्या मृत्यूबाबत तातडीच्या चर्चेची मागणी केली.

Ajit Pawar Baramati Plane Crash | Sarkarnama

कार्यकाळ

या अधिवेशनानंतर मिटकरी यांच्या आमदारकीचा कार्यकाळ देखील संपला आहे.

Amol Mitkari | Sarkarnama

कृतज्ञता

याच पार्श्वभूमीवर 6 वर्षांपूर्वी अजितदादांनी दिलेल्या आमदारकीबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करताना दिसले.

Amol Mitkari With Ajit Pawar Photo | Sarkarnama

भावूक

अजितदादांचा शेवटचा फोटो हातात घेतलेले मिटकरी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

Amol Mitkari With Ajit Pawar Photo | Sarkarnama

देवमाणूस

एक्सवर त्यांनी लिहिलं की, 'आमदार-खासदारकी असेल नसेल मात्र 'दादा'नावाचा देवमाणूस परत महाराष्ट्र व देशाच्या पटलावर दिसणार नाही.

Amol Mitkari With Ajit Pawar Photo | Sarkarnama

लढाई

हे सत्य आता स्वीकारुन पुढे जावे लागेल. अधिवेशनात अखेरचा दिवस जरी असला तरी खरी लढाई आता सुरू करू.

Ajit Pawar Photo | Sarkarnama

अखेरचा फोटो

दादांचा हा अखेरचा फोटो उद्याच्या पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Amol Mitkari With Ajit Pawar Photo | Sarkarnama

जिवंतपणा

तर दादांच्या अनुपस्थितीने या अधिवेशनातला जिवंतपणा संपलेला होता. अधिवेशन केवळ औपचारिकता वाटत होती, असंही त्यांनी म्हटलं.

Amol Mitkari With Ajit Pawar Photo | Sarkarnama

मिस यू दादा

'कर्तव्य संपले नाही. लढाई मरेपर्यंत कायम राहील मिस यू दादा दिल दिया है जान भी देंगे', अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Amol Mitkari With Ajit Pawar Photo | Sarkarnama

NEXT : कधी काळी होते शरद पवारांचे खंदे सहकारी, विदर्भात आरोग्य सेवेचं मॉडेलही उभं केलं : दत्ता मेघेंची कारकीर्द 10 मुद्द्यांत

Datta Meghe death | Sarkarnama
क्लिक करा