सरकारनामा ब्यूरो
फडणवीस सरकारचा या टर्मचा पहिलाच अर्थसंकल्प सोमवारी (ता.10) ला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळालं.
येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. यासाठी परिवहन विभागाला 3 हजार 610 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्तावित मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईतील भुयारी मार्गासाठी 64 हजार 783 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
मुंबईतमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र उभारली जाणार असून 'ग्रोथ हब' म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तरुण पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी आणि बेगळुरू-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोअरसाठी भूसंपादनाचं काम सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे.
वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी 64 हजार कोटींचा प्रकल्पाचा प्रस्तावित आहे. यामध्ये तळेगाव ते चाकण या मार्गाच्या कामाचा प्रस्ताव असल्याचं अजित पवारांनी सभागृहात सांगितलं.
नवी मुंबई येथे 1हजार 160 हेक्टर क्षेत्रातील उलव्यात नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे 85 टक्के काम झाले असून यांचे यशस्वी उड्डाण चाचणी झाली आहे. देशांतर्गत ही विमानसेवा 25 एप्रिलपासून सुरु होण्याचे नियोजन आखण्याचे म्हटले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मेट्रो मार्गाच्या कामाला लवकरचं सुरु होणार.
मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थापन केली जाईल. याच अंतर्गत एक तालुका,एक बाजार समिती योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे.