Pradeep Pendhare
कॅनडामध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेला बाहेरील व्यक्ती पंतप्रधान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मार्क कार्नी यांनी सदस्यांच्या मते 86 टक्के जिंकली असून पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अन् अमेरिकेशी व्यापार चर्चेचे नेतृत्वासाठी ते सर्वात योग्य आहेत.
मार्क कार्नी यांचा जन्म कॅनडातील वायव्य प्रदेशातील फोर्ट स्मिथ इथं झाला असून त्यांचं बालपण एडमंटनमध्ये गेलं आहे.
हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण, युनायटेड किंग्डमला ऑक्सफर्ड विद्यापीठातून 1995 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम पदव्युत्तर पदवी आणि नंतर डॉक्टरेट मिळवली.
2008 मध्ये कार्नी यांची बँक ऑफ कॅनडाचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली.
2010 मध्ये टाईम मासिकाने त्यांना जगातील 25 सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून घोषित केले.
2011 मध्ये, रीडर्स डायजेस्ट कॅनडाने त्यांना 'मोस्ट ट्रस्टेड कॅनेडियन' म्हणून घोषित केले आणि 2012 मध्ये युरोमनी मासिकाने त्यांना "सेंट्रल बँक गव्हर्नर ऑफ द इयर" म्हणून घोषित केले.
2013 मध्ये, कार्नी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बनले. संस्थेच्या 300 वर्षांच्या इतिहासात ते पहिले बिगर-ब्रिटिश नागरिक बनले.