सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत.
आज पहाटेच त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरास भेट दिली.
अजित पवार यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पहाटेची आरती करण्यात आली.
मंदिर समितीचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांनी स्थानिकांसोबत संवाद साधला.
आरतीनंतर त्यांनी पुण्यातील भिडे वाड्याला भेट दिली. भिडे वाड्याच्या कामाची पाहणी केली.
यानंतर त्यांनी महात्मा फुले वाड्यातील सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या स्मारकाला त्यांनी नमन केले.
यावेळी अजित पवार यांच्यासोबत शहराध्यक्ष दिपक मानकर व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.