Aslam Shanedivan
महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेत 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या.
या योजनेत सरकारी महिला कर्मचारी आणि पुरूष लाभार्थ्यांसह राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थ्यांचा भांडा फोड झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 4 हजार तर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1 लाख, 25 हजार 300 बोगस लाभार्थी निघाले आहेत.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्याही जिल्ह्यात बोगस लाडक्या बहिणी आहेत.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आशीष शेलार यांच्यासह पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातही हजारो बोगस लाभार्थी आढळल्या आहेत.
यानंतर राज्यभर खळबळ उडाली असून अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी संतापून उलट सवाल करताना, "...मग योजना बंद करू का?" अशी प्रतिक्रिया दिली आहे.