Pradeep Pendhare
CM देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात 95 हजार 500 बोगस लाभार्थी आढळून आले.
DCM अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 4 हजार बोगस लाभार्थींना अपात्र ठरवले आहे.
DCM एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 300 लाभार्थींना अपात्र ठरवले गेले आहे.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 756 लाभार्थी बोगस आढळले.
छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ मंत्रीपद भूषवत असलेल्या नाशिक जिल्ह्यात 1 लाख 86 हजार 800 लाभार्थी बोगस आढळले.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1 लाख 4 हजार 700 लाभार्थी बोगस आढळले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 1 हजार 400 हजार बोगस लाभार्थ्यांना अपात्र ठरवले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मुंबई उपनगरात 1 लाख 13 हजार, तर महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये 63 हजार लाभार्थी अपात्र ठरवले गेलेत.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात 71 हजार, तर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या लातूरमध्ये 69 हजार बोगस महिला अपात्र ठरल्या आहेत.
सोलापूरात 1 लाख 4 हजार, सातारा 86 हजार, सांगली 90 हजार, पालघरमध्ये 72 हजार बोगस लाभार्थी आढळले.
जालनामध्ये 73 हजार, धुळे 75 हजार, अमरावतीमध्ये 61 हजार बोगस लाभार्थी अपात्र ठरले असून, त्यांना अपात्र केले आहे.
सर्वात कमी अपात्र लाडक्या बहिणी गडचिरोलीत 18 हजार, वर्धामध्ये 21 हजार, भंडारा आणि सिंधुदुर्गमध्ये 22 हजार आढळल्या आहेत.