सरकारनामा ब्यूरो
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार हे धाकटे पुत्र आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजकारणात पदार्पण केले होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि विद्या प्रतिष्ठानच्या उपक्रमात ते सहभागी होतात. क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर आदी विविध उपक्रमांद्वारे ते सार्वजनिक जीवनातही सक्रिय आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा सुरुवातीला होती.
अजित पवारांच्या बंडानंतर पार्थ हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत.
वडील अजित पवार आणि आजोबा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले.
मुंबईतील एचआर महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली. उच्च शिक्षणासाठी ते लंडनला रवाना झाले.
मागील लोकसभा निवडणुकीमध्ये ते मावळ मतदारसंघातून उभे होते. शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता.
R