Deepak Kulkarni
छत्रपती शिवाजी महाराजांची शनिवारी (ता.12) तिथीनुसार पुण्यतिथी किल्ले रायगडावर साजरी करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही किल्ले रायगडावर दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं.
गृहमंत्री व भाजप नेते अमित शाहांच्या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या हटके लूकची तुफान चर्चा होती.
अजितदादांनी रायगडावरील कार्यक्रमावेळी हटके स्वॅग पाहायला मिळाला.
अजित पवारांनी डोळ्यांवर गॉगल अन् डोक्यावर पांढरी हॅट घातल्याचे पाहायला मिळाले.
अजितदादा हे नेहमीच रोखठोक वक्तव्यं, ग्रामीण भाषाशैली आणि लक्षणीय पोशाख, लूक यांसाठीही ओळखले जातात.
मंत्री आदिती तटकरे यांनी अमित शाहांचं स्वागत केलं.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त (तिथीप्रमाणे) स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतानाच अजित पवारांनी यावेळी महाराजांच्या पालखीचंही दर्शन घेतलं.
खुद्द भाजपचे राजकीय चाणक्य अमित शाह हेच रायगड दौऱ्यावर आल्यानं रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवारांनीही मराठमोळ्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.