सरकारनामा ब्युरो
रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वे सुरू होणार आहे.
16 जुलै 2025 पासून राज्यभरातील शिवप्रेमींना रेल्वेतून शिवरायांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळांना भेटी देता येतील.
या दहा दिवसांच्या यात्रेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचण्यास मदत होईल.
या यात्रेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शिवकालीन किल्ले, राजवाडे आणि ऐतिहासिक युद्धभूमी यांचा समावेश असणार आहे.
केंद्र सरकारच्या 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.
'ही यात्रा म्हणजे केवळ पर्यटन नव्हे, तर देशभक्तीचा अनुभव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राशी नव्या पिढीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.