Sunil Balasaheb Dhumal
अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार बांधणी केली आहे.
पक्षाची बांधणी करताना अजित पवार युवक आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत आहेत.
यातूनच नगरच्या जामखेडमधील संध्या सोनवणे यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
संध्या सोनवणे या जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हणून जोरदार काम केले आहे.
कामाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली.
त्यांना पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
या पदाच्या माध्यमातून युवतींना राजकारणात सक्रिय करणे आणि त्यांच्यात धाडस निर्माण करणार असल्याचे संध्या यांनी सांगितले.
संध्या सोनवणे या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.