Pradeep Pendhare
IPS लक्ष्मी सिंग 2000 मध्ये भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. 2013 मध्ये पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) आणि 2018 मध्ये पोलिस महानिरीक्षक (IG) म्हणून नियुक्त झाले होते.
शालेय शिक्षण लखनऊच्या लोरेटो कॉन्व्हेंटमधून झाले. लखनौ विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. पदवी आणि सुवर्णपदक मिळवले आहे. समाजशास्त्रात एमएही केले.
लक्ष्मी सिंग यांनी यापूर्वी 1 जानेवारी ते 5 मार्च 2018 या कालावधीत गौतम बुद्धनगरमध्ये विशेष टास्क फोर्स (STF)चे IG/DIG म्हणून काम केले आहे.
आयजी रेंज लखनऊ या पदावर बदली होण्यापूर्वी त्यांना मार्च 2018 ते 26 मे 2020 या कालावधीत मेरठमधील पोलिस ट्रेनिंग स्कूलचे आयजी बनवण्यात आले.
28 नोव्हेंबर 2022 त्यांची गौतम बुद्ध नगर (नोएडा) पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली, उत्तर प्रदेशची पहिली महिला पोलिस आयुक्त बनली.
लक्ष्मी सिंह पोलिस अधिकारी म्हणून गुन्हेगारांमध्ये दहशत आहे. त्यांच्या नावाने देखील गुन्हेगार थरथर कापतात, असे सांगितले जाते.
IPS लक्ष्मी सिंह यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पंतप्रधानांच्या हस्ते चांदीचा दंडक आणि गृह मंत्रालयाने 9 एमएम पिस्तूल प्रदान केले आहे. याशिवाय तिला मुख्यमंत्री उत्कृष्ट सेवा पोलीस पदकही मिळाले आहे.
लक्ष्मी सिंह यांचा विवाह लखनौ जिल्ह्यातील सरोजिनी नगर विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश्वर सिंह यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगी आहे. राजेश्वर सिंग हे देखील आयपीएस अधिकारी होते.