सरकारनामा ब्यूरो
सोशल मीडियावर झापुक झुपुक नावाने प्रसिद्ध असलेला रील स्टार आणि 'बिग बाॅस' शोचा विजेता ठरत संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चेत आलेला अभिनेता सूरज चव्हाण.
'बिग बाॅस' विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाण ट्राॅफी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेला होता.
सूरजने त्याचे घर बांधण्याची इच्छा असल्याचे अजितदादांना सांगितले होते. त्यावेळी त्याला घर बांधून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते.
अजित पवार रविवारी (ता.13) बारामती दौऱ्यावर आले असताना, त्यांनी सूरज चव्हाण याच्या गावात जाऊन बांधकाम सुरू असलेल्या घराची पाहणी केली.
घराचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिल्या आणि दिवाळीपूर्वी घराचे संपूर्ण काम पूर्ण करण्यास अजितदादांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 'X' प्लॅटफाॅमवर सूरज यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घराचे फोटो शेअर केले आहेत.
मी दिलेला शब्द पाळत आहे. लोकांना माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि सूरजला दिलेला शब्द मी पाळतोय, अस अजित पवार यावेळी म्हणाले.