Roshan More
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी चीनवरचा टॅरिफ कायम ठेवत बाकीच्या देशांना टॅरिफमध्ये सवलत दिली होती. आता माघार नाही म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी पुन्हा यूटर्न घेतला आहे.
माघार नाही म्हणाऱ्या ट्रम्प यांनी इलेक्ट्राॅनिक वस्तुंवर ट्रॅरिफमध्ये सवलत जाहीर केले आहे. विशेष म्हणजे या घोषणेत चीनमधून येणाऱ्या इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर देखील सवलत आहे. पाहूया कशावर सवलत आहे.
स्मार्टफोनवरील लागू करण्यात आलेला टॅरिफला स्थिगिती दिली असून सवलत देण्यात आली आहे.
लॅपटॉप व कॉम्प्युटर या इलेक्ट्राॅनिक वस्तूंना सवलत दिली.
हार्ड ड्राइव्हसवर देखील सवलत लागू केलेली आहे.
इलेक्ट्राॅनिक वस्तुंमध्ये महत्त्वाच्या असलेल्या रॅम सारख्या चिप्सवर सवलत देण्यात आली आहे.
सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी लागणाऱ्या विशेष यंत्रांवरही सवलत देण्यात आली आहे.
अमेरिकेमध्ये इलेक्ट्रीक वस्तुंचे उत्पादन होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. अमेरिकन कंपन्या बाहेरील देशात कंपन्यांची स्थापना करून तेथे वस्तू अमेरिकेत आयात करतात. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन ग्राहकांना तसेच कंपन्यांना फायदा होणार आहे.