Aslam Shanedivan
राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील
यावेळी त्यांच्या नावे आता नवा विक्रम नोंद होणार असून ते आपला 11 वा अर्थसंकल्प सादर करतील
पण यांच्याही आधी शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर केला असून त्यांच्या नावे विक्रमाची नोंद आहे
शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यानंतर अजित पवार यांचा दुसरा क्रमांक लागतो.
यानंतर जयंत पाटील यांचा नंबर लागत असून त्यांनी 10 अर्थसंकल्प सादर केले आहे
जयंत पाटील यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहे
माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत काँग्रेस बॅरिस्टर रामराव आदिक यांनी देखील 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे