Sunil Balasaheb Dhumal
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून आपला उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामतीत असलेल्या अजितदादांनी लोकसभेत साथ देण्याचे आवाहन बारामतीकरांना केले आहे.
मी देईन त्या उमेदवाराला मत द्या, अशी गळच अजित पवारांनी बारामतीकरांना घातली.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना, तर लोकसभेला तिकडे (सुप्रिया सुळे) मत देऊ, असा विचार मनात आणू नका.
लोकसभेला मिठाचा खडा लागला, तर आमदारकीच्या बाबतही मी वेगळा निर्णय घेईन, असा निर्वाणीचा इशाराच पवारांनी दिला.
मी जे काम करीत आहे, ते कोणीच करू शकणार नाही, असा दावाही अजित पवार यांनी केला.
आता अजित पवार लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळेंविरोधात कुणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष आहे.