Kunal Raut Arrest : काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊतांना अटक, काय आहे कारण ?

Sunil Balasaheb Dhumal

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

Kunal Raut | Sarkarnama

कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत.

Kunal Raut | Sarkarnama

कुणाल यांनी नागपूर जिल्हा परिषदेतील 'मोदी की गॅरंटी' आशयाच्या पोस्टर्सला काळे फासले होते.

Kunal Raut | Sarkarnama

मोदी या शब्दावर भारत असे स्टिकर लावून पोस्टर्सची छेडछाड केली होती.

Kunal Raut | Sarkarnama

या आंदोलनामुळे नागपूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Kunal Raut | Sarkarnama

नागपूर पोलिसांनी कुणाल राऊतांना नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले होते.

Kunal Raut | Sarkarnama

त्यानंतर बेपत्ता असलेल्या राऊतांना कुही येथून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Kunal Raut | Sarkarnama

राऊतांनी पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून प्रसिद्धी करतात, असा आरोप केला.

Kunal Raut | Sarkarnama

NEXT - कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय थेट UPSC उत्तीर्ण; मुस्कान डागर अशा बनल्या IAS अधिकारी