Vijaykumar Dudhale
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील पंधरा दिवसांपूर्वी केलेले विधान खरे ठरू लागले आहे. पवार कुटुंबीयांमध्ये सगळे मिळून मला एकटं पाडतील, असे विधान अजितदादांनी केले होते.
अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत नागरिकांशी संवाद साधत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीनिवास पवार यांच्या निर्णयापूर्वी त्यांचे चिंजीव आणि अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आजोबा शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. युगेंद्र पवार यांनी मुंबईत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती.
युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरचंद्र पवार पार्टीच्या बारामतीतील कार्यालयाला भेट दिली होती, त्याचवेळेपासून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे बोलताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जमीन आपल्या नावावर केली म्हणजे घरातील वयस्कर लोकांना घराबाहेर काढायचं नसतं. त्यांना पहिल्या दिवसापासून आतापर्यंत साहेबांमुळं पदं मिळाली आहेत. त्याच साहेबांना आता घरी बसा, असं म्हणणं मला पटलं नाही. पुढची दहा वर्षे आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, म्हणून आपण वयस्कर माणसांची किंमत करायची नाही, यासारखा नालायकपणा नाही.
मी अजितदादांना म्हटलं होतं की, आमदारकी तुमच्याकडे आहे, तर खासदारकी साहेबांकडे ठेवू. कारण साहेबांचे आमच्यावर अनेक उपकार आहेत.
औषधाच्या पाकिटावर जशी एक्सपायरी डेट असते, तशी काही नात्यांचीही एक्सपायरी डेट असते. तशी एक्सपायरी झाली असं समजायचं आणि पुढे चालत राहायचं. वाईट वाटून घ्यायचं नाही, असेही श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले होते.
R
इंडिया आघाडीने फुंकलं रणशिंग; देशभरातील नेत्यांनी दिल्या 'या' घोषणा