Sunil Balasaheb Dhumal
काँग्रेसनेते राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबई येथे झाला.
या सभेला इंडिया आघाडीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते.
या समारोपाच्या सभेतून इंडिया आघाडीतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
भाजपवर टीका करताना अनेक नेत्यांनी विविध घोषणा दिल्या.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'अब की बार भाजप तडीपार' असा घणाघात केला.
ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मुंबईतून 'भाजप छोडो'चा नारा दिला.
कम्युनिस्ट पार्ट (एम)चे राष्ट्रीय सचिव दिपांकर भट्टाचार्य यांनी 'जुमला नही जबाब दो', हिसाब दो, अशी घोषणा केली.
आपचे नेते, दिल्लीचे मंत्री सौरभ भारदवाज यांनी लढेंगे और जितेंगे असा विश्वास व्यक्त केला.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपा भगाव-भारत बचाव असा नारा दिला.
झारखंचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी 'झारखंड झुकेगा नहीं' असे म्हणत भाजपला ललकारलं.