Sunil Tatkare : शरद पवारांना अंगावर घेणारा; अजितदादांचा एकनिष्ठ शिलेदार : सुनील तटकरे

Vijaykumar Dudhale

फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण

सुनील तटकरे यांचा जन्म 10 जुलै 1955 रोजी सुतारवाडी-कोलाड (ता. रोहा, जि. रायगड) येथे झाला. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर सायन्सपर्यंत शिक्षण घेतले.

Sunil Tatkare | Sarkarnama

काँग्रेस पक्षात 1984 मध्ये प्रवेश

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सुनील तटकरे हे रस्त्याचे काम करणारे ठेकेदार होते. त्यांनी 1984 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Sunil Tatkare | Sarkarnama

1995 मध्ये आमदार

रायगड जिल्ह्यातील माणगाव मतदारसंघातून सुनील तटकरे हे 1995 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे विनोद घोसळकर यांचा पराभव केला होता.

Sunil Tatkare | Sarkarnama

राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर सुनील तटकरे हेही राष्ट्रवादीत सामील झाले. त्यानंतर 1999, 2004 ते माणगाव मतदारसंघातून निवडून आले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ते श्रीवर्धन मतदारसंघातून 2009 निवडून आले.

Sunil Tatkare | Sarkarnama

राज्यमंत्री

विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात सुनील तटकरे हे 1999 ते 2003 च्या दरम्यान राज्यमंत्री हेाते. पुढच्या देशमुख यांच्या मंत्रिमंडळात तटकरे यांना बढती मिळाली आणि ते कॅबिनेट मंत्री झाले.

Sunil Tatkare | Sarkarnama

अर्थमंत्री

अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सुनील तटकरे राज्याचे अर्थमंत्री झाले. ते 7 नोव्हेंबर 2009 ते 10 नोव्हेंबर 2010 पर्यंत या पदावर हेाते.

Sunil Tatkare | Sarkarnama

लोकसभेला पराभव

सुनील तटकरे यांनी 2014 च्या मोदी लाटेतही रायगड लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना जोरदार टक्कर दिली होती. अटीतटीच्या लढतीत तटकरे यांचा अवघ्या 2110 मतांनी पराभव झाला होता.

Sunil Tatkare | Sarkarnama

पराभवाचा वचपा

तटकरे यांनी 2014 मधील निसटत्या पराभवाचा वचपा 2019 च्या निवडणुकीत काढला आणि ते रायगडमधून 31 हजार 438 मतांचे अधिक्य घेत निवडून आले.

Sunil Tatkare | Sarkarnama

रामायणातील घटनाक्रमानुसार मोदींनी दिल्या 'या' मंदिरांना भेटी!

PM Narendra Modi | Sarkarnama
NEXT : येथे क्लिक करा