Jagdish Patil
ऐन विधानसभेच्या तोंडावर माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
अपक्ष उमेदवारी केल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
त्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत.
शिवसेना नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि हीना गावित यांच्यात टोकाचा वाद आहे. याचेच पडसाद आता या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत.
ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या हिना गावित यांचा राजकीय प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया.
हीना गावित यांचा जन्म 28 जून 1987 रोजी नंदूरबार येथे झाला. डॉ. विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत.
त्या 2014 मध्ये त्या पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यावेळी त्या 26 वर्षांच्या होत्या.
गावित यांनी पहिल्याच टर्ममध्ये केलेल्या कामाची दखल PM मोदींनी घेतली होती. त्या 2019 लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.