सरकारनामा ब्यूरो
देशातील सगळ्यात अवघड परीक्षा कोणती तर ती यूपीएससीची आणि याच परीक्षेत पास होऊन 9 वी रँक मिळविणे म्हणजे कौतुकाचीच गोष्ट...
अपाला मिश्रा या उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथील आहेत. यूपीएससी सारखी कठीण परीक्षा अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी पास केली.
अपाला मिश्रा यांचे वडील अमिताभ मिश्रा हे आर्मीमध्ये कर्नल होते.
'यूपीएससी'ची तयारी करताना कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय अपाला यांनी इंटरव्यूमध्ये रिकॉर्ड ब्रेक मार्क्स मिळविले.
अपाला मिश्रा लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार असल्याने त्यांनी त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे देहरादून येथून पूर्ण केलं. तर 12वी ही दिल्ली येथून दिली. आर्मी कॉलेज मधून 'बीडीएस'ची पदवी घेऊन त्या डेंटिस्ट झाल्या.
मेडीकलचा अभ्यास करत असताना त्यांच्या मनात 'यूपीएससी' परीक्षा देण्याचा विचार आला आणि त्यांनी वेळ न घालवता परीक्षेची तयारी सुरु केली.
अपाला यांनी दोनदा यूपीएससीची परीक्षा दिली परंतु त्यांना दोन्ही वेळेला अपयश आले. त्यांनी न थांबता आपले प्रयत्न सुरुचं ठेवले आणि 2020 मध्ये यश प्राप्त करत त्या यूपीएससीत टॉपर ठरल्या.
अपाला यांनी यूपीएससीच्या इंटरव्यूमध्ये 275 पैकी 215 मार्क्स मिळवले. तरीही त्यांची नियक्ती 'आईएफएस' या पदासाठी करण्यात आली.
अपाला या भारतीय परराष्ट्र सेवेत कार्यरत आहेत.