Jagdish Patil
उद्धव ठाकरेंना अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद जकारिया यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार आणि नाना पटोले यांना पत्र लिहिलं आहे.
दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात ठाकरेंना उमेदवारी दिल्यास जातीय सलोखा निर्माण होईल असा दावा त्यांनी केला आहे.
ठाकरेंना इथले मतदार मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वासही जकारिया यांनी व्यक्त केला.
तर ठाकरेंच्या उमेदवारीसाठी पवार पटोलेंना पत्र लिहिणारे जावेद जकारिया कोण आहेत जाणून घेऊया.
अकोल्यातील जकारिया फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. मुस्लिमातील कच्छी मेनन समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
कोरोना काळात त्यांनी 2200 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुकही झालं होतं.
वर्षभरापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे त्यांनी राजीनामा दिला.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलं आहे.