Rashmi Mane
आज (२ ऑक्टोबर) गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रशांत किशोर आपल्या नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत.
2 ऑक्टोबर रोजी पाटण्यात नव्या पक्षाची घोषणा करणार असून पक्षाच्या शुभारंभानंतरही 'जन सूराज' पदयात्रा सुरूच राहणार असल्याचे पीके यांनी जाहीर केले आहे.
पक्षाच्या शुभारंभानंतरही 'जन सूराज पदयात्रा' सुरूच राहणार असल्याचे पीके यांनी जाहीर केले आहे. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जन सूराज 2025 मध्ये बिहारमधील 243 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे पीके यांनी म्हटले आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा सगळ्यात जास्त चर्चा झाली ती प्रशांत किशोर यांची. मोदींच्या आणि भाजपच्या विजयामध्ये किशोर यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच राजकीय पक्षांचीही उत्सुकता प्रशांत किशोर यांच्याबद्दल जाणून घेण्यात वाढली. प्रत्येकाला त्यांच्या पर्सनल लाईफविषयी जाणून घ्यायचे होते.
गेल्या अनेक वर्षांत अनेक पक्षांसाठी यशस्वी रणनीती ठरवून आपला ठसा उमटवणाऱ्या प्रशांतच्या कौटुंबिक जीवनाविषयी आता फार कमी लोकांना माहिती आहे.
प्रशांत किशोर हे बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावातील रहिवासी. त्यांचे वडील दिवंगत श्रीकांत पांडे हे डॉक्टर होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडीलांची बदसी जिथे व्हायची त्या गावातील सरकारी शाळेत झाले.
त्यानंतर त्यांनी पटना विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेतले. जेव्हा ते हिंदू कॉलेजमध्ये शिकत होते ,तेव्हा त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागले. शेवटी त्यांनी लखनौमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनंतर त्यांना कसेबसे UN मध्ये नोकरी मिळाली.
प्रशांत किशोर यांच्या पत्नी मूळच्या आसाममधील गुवाहाटी येथील आहेत. असून त्या डॉक्टर आहेत. UN आरोग्य कार्यक्रमात एकत्र काम करत असताना प्रशांत आणि जान्हवी यांची भेट झाली होती. या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. काही काळानंतर त्यांनी लग्न केले.
प्रशांत किशोर इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी (I-PAC) ही कंपनी चालवतात.