Akola : दंगल, आरोप आणि मोर्चानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये

प्रसन्न जकाते

दंगलींचा भडका

अकोल्यात गेल्या काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था पुरती बिघडली होती. जातीय दंगलीने एकाचे प्राणही घेतले.

Riots in Akola | Sarkarnama

तणावाची मालिका

अकोला शहरातील वेगवेगळ्या भागातील तणावाची मालिका थांबण्याचे नाव घेत नव्हती.

Communial Clashes | Akola

पोलिसांवर गंभीर आरोप

अकोल्यातील दोन आमदारांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. एका आमदाराने तर थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली.

Police | Sarkarnama

संदीप घुगेंवर रोष

अकोल्यात संदीप घुगे पोलिस अधीक्षक झाल्यावर तणावाच्या अनेक घटना घडल्या. अवैध धंदेही वाढले. त्यामुळे अनेकांचा घुगेंवर रोष होता. डिसेंबर 2023 मध्ये त्यांची बदली झाली.

Sandip Ghuge & Bacchan Sing | Sarkarnama

डीपीसी बैठकही गाजली

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जिल्हा नियोजन समितीची बैठकही कायदा व सुव्यवस्थेच्या कारणांमुळे गाजली.

DPC Meeting | Sarkarnama

कडक कारवाईचे आदेश

डीपीसीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.

Radhakrishna Vikte Patil | Sarkarnama

शिवसेनेचा मोर्चा

अकोल्यात शिवसेनेच्यावतीने विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात आला. त्यात कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष वेधण्यात आले.

Shivsena Morcha | Sarkarnama

पोलिस लागले मोहिमेवर

अकोल्यातील एकूणच परिस्थिती पाहता पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आता येथील आव्हान स्वीकारले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी कामाला लावले असून ते स्वत: देखील ‘फिल्ड’वर उतरले आहेत.

Akola Police | Sarkarnama

Next : IAS Anshika Verma अभिनेत्रींपेक्षाही सुंदर! कोण आहेत अंशिका वर्मा?

IPS Anshika Verma
येथे क्लिक करा