Pradeep Pendhare
अक्षयच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्याविरोधात अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवर अक्षयला ठाणे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहातून ताब्यात घेतलं.
सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांच्या वाहनातून मुंब्रा बाह्यवळण मार्गावर अक्षयने एका अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा
बंदूक हातात येताच, 'मी एकालाही जिवंत सोडणार नाही', असे म्हणत पोलिसांवर अक्षय शिंदे याने गोळ्या झाडल्या.
या घटनेत एक गोळी सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्या मांडीला लागल्यानं ते जखमी झाले. यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या.
ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते. मात्र, पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेख नाही.
बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिस चकमकीत ठार झाला.
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर कसा झाला याचा तपास सीआयडी करणार आहे.
बदलापूरमध्ये ऑगस्ट महिन्यात ही घटना एका प्रतिथयश शाळेत घडली असून, त्या शाळेचे विश्वस्त गुन्ह्यात फरार आहेत.