Vijaykumar Dudhale
हर्षवर्धन पाटील यांचा 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा दत्तात्रेय भरणे यांच्याकडून पराभव झाला.
अजित पवार यांनी शिवसेना-भाजपसोबत युती केल्याने हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमध्ये पुन्हा राजकीय कोंडी झाली आहे.
गेली चार वर्षापासून भाजपकडून त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. मात्र, साधारण सहा महिन्यांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
एकमेकांचे कट्टर विरोधक असूनही हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे काम केले. मात्र, इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय भरणे आमदार असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर मतदारसंघावर दावा सांगितला आहे.
राष्ट्रवादीने इंदापूरवर दावा केल्याने हर्षवर्धन पाटील यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांनी दोन वेळा भेट घेतली आहे.
पितृपंधरवड्यानंतर राजकीय निर्णय घेण्याची शक्यता हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्ष व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घ्यावी, असा दबाव समर्थक त्यांच्यावर आणत आहेत.