Roshan More
अल्बानिया देशात प्रथमच AI जनरेटेड मंत्री संसदेत बोलताना दिसला.या AI जनरेटेड या व्हर्च्युअल मंत्र्याचे नाव 'डायला' आहे.
डायला या व्हर्च्युअल अवताराने अल्बानिया देशाच्या संसदेत भाषण केले आणि सर्वांचे लक्ष वेधले.
डायला म्हणाली , मी माणसाची जागा घेण्यासाठी नाही तर त्यांना मदत करण्यासाठी आले आहे.
तिचं मुख्य काम म्हणजे भ्रष्टाचार कमी करणे आणि प्रक्रिया पारदर्शक करणे, हे असणार आहे.
मानवी हस्तक्षेप आणि राजकीय दबाव टाळणे हाही उद्देश एआय मंत्री नेमण्यामागे आहे.
निविदा प्रक्रियेत डेटा तपासणी, करारांची पडताळणी, आकडेवारी विश्लेषण ती करणार आहे.
विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित करत मानवी जबाबदारी कोण घेणार? असे म्हटले तसेच या विरोधात ते न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.