Ganesh Sonawane
शबरीमाला हे केरळमधील प्रसिद्ध मंदिर असून दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. हे मंदीर म्हणजे एक जागृत देवस्थान असल्याची भक्तांची भावना आहे.
2019 साली गर्भगृहाला सोन्याचा मुलामा देण्यासाठी 42 किलो सोने मंदिरातून नेण्यात आले. या कामासाठी खास सोन्याच्या प्लेट्स वापरल्या गेल्या.
काम पूर्ण झाल्यानंतर सोन्याच्या प्लेट्स पुन्हा गर्भगृहात बसवण्यात आल्या. मात्र प्लेट्सच्या वजन तपासणी दरम्यान धक्कादायक बाब समोर आली.
42 किलो सोन्यापैकी फक्त 38 किलोच वापरले गेले असल्याचे दिसले. उरलेले तब्बल 4.45 किलो सोनं गायब झाले होते.
सोने गायब झाल्याच्या घटनेमुळे मंदिर प्रशासनात खळबळ उडाली. भक्तांमध्ये संताप व शंका व्यक्त होऊ लागल्या.
सोने गायब प्रकरण थेट केरळ उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने या गंभीर घटनेची सखोल दखल घेतली.
उच्च न्यायालयाने सोन्याच्या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने सहकार्य करावे, असेही निर्देश दिले.
तपासादरम्यान मंदिरातील द्वारपालाच्या मूर्ती व रचना यांची बारकाईने तपासणी केली जाणार आहे. गायब सोन्याचा ठावठिकाणा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.